Saturday, November 10, 2018

Friday, November 2, 2018

Textual description of firstImageUrl

कविता - मातृत्व आणि कारकीर्द

Top post on IndiBlogger, the biggest community of Indian Bloggers

सर्व महिलांना ज्या आपल्या अपत्याला कारकीर्द समजतात आणि ज्या महिला मातृत्व आणि कारकीर्द या दोन्ही आघाड्यावर लढतात त्यांना समर्पित. अपत्याला जन्म दिल्यानंतर तीन वर्षा नंतर व्यावसायिक कारकीर्द सुरु करणाऱ्या शुभेच्छा.

कविता - मातृत्व आणि कारकीर्द 

नवा सूर्य अन नवी आशा
नवीन पर्व अन नवीन दिशा
अपत्यासाठी तीन वर्ष कार्य विराम
मुल अन कारकीर्द यांना नाही विश्राम 
पेललेले आव्हान पुन्हा जगणार
जिंकलेले क्षितिज पुन्हा गाठणार
मातृत्वात दिली संयमाची परीक्षा
कर्तव्यदक्ष होईन हीच खरी अपेक्षा 
कार्यक्षमता अन संयम माझा बाणा
कुटुंब हाच मा‍झ्या जगण्याचा कणा
वाट बघताय माझ एकटे पिलू घरट्यात
मन ओथंबले करियरच्या आखाड्यात
घररुपी बंधाने पतंग इंद्रधनुवर स्वार
परिस्थितीत कधीही मानणार नाही हार

कविता - मातृत्व आणि कारकीर्द
मातृत्व आणि कारकीर्द


Photo Courtesy - Google

Sunday, October 28, 2018

Textual description of firstImageUrl

लघुकथा – निरोप समारंभ

Top post on IndiBlogger, the biggest community of Indian Bloggersलघुकथा – निरोप समारंभ


तुषारचा आज ऑफिस मध्ये शेवटचा दिवस होता. त्याच संध्याकाळी त्याने ऑफिस मधील मित्रांना पार्टी साठी बोलावले होते. त्यासाठी त्याने सगळ्यांना तशी ई-मेल केली होती. त्यात मंगेशला सुद्धा आमंत्रण दिले होते. तुषार आणि मंगेश मध्ये काही विशेष मित्रत्वाचे संबंध नव्हते. पण त्याला स्वत:ला मंगेशला आमंत्रित करावेसे वाटले. यांचे उत्तर तुषार कडे नव्हते.


पण मंगेश पार्टीला आला आणि त्याने खूप मौज मस्ती केली. तुषारला वाटले की तो स्वतः कंपनी सोडून जाणार आहे आणि त्यामुळे मंगेशच्या मार्गातील काटा निघाला म्हणून मंगेश खुष आहे का? की मित्राच्या आनंदात मंगेश खुष आहे हे समजत नव्हते. पण दोघांनी जेवण मस्त पैकी एन्जॉय केले. त्यांच्या सोबत बरीच मित्र मैत्रिणी सुद्धा होत्या. सगळे एकमेकांच्या आठवणी सांगण्यात मशगुल झाले होते.

पार्टी संपल्यानंतर मंगेश आणि तुषार बोलत थांबले. त्या दोघांचे घर एकाच भागात होते त्यामुळे तुषारला मंगेश गाडीत त्याच्या घरी सोडणार होता. तुषार म्हणाला मंगेश तू आलास मला खूपच आनंद झाला.

“अरे तुझा ऑफिस मधील शेवटचा दिवस आणि मी नाही येणार असे होईल का”
“तू जरी बोलवले नसतेस तरी मी आलोच असतो. कारण मी आज खूष आहे. तू चाललास आणि मला अडवणारे आता कोणीच नाही.”
"असे तुला वाटत असेल तर असे काही नाही. तुलाही माहीत आहे मला छुपे वार करणाऱ्या मित्रा पेक्षा समोरून वार करणारा विरोधी आवडतो."
मित्रा तुला भविष्या साठी खूप-खूप शुभेच्छा!!!
असे म्हणून मंगेशने कार सुरू केली. आणि त्यांना त्यांचे मागील दिवस आठवले.
तुषार बोल घेवडा, प्रचंड महत्वाकांक्षी आणि बहिर्मुख मनुष्य होता. तुषार हसतमुख आणि आनंदी व्यक्तिमत्वाचा धनी होता. तो प्रत्येकाशी संवाद साधण्याची त्याची विशेष हातोटी होती. तुषार कंपनीत आपल्या प्रभावी कौशल्या मुळे भराभर हुद्दे मिळवत गेला. त्यात त्याला कोणत्याही परिस्थितीत आपला फायदा करून घ्यायचा हे तंत्र माहिती होत.
त्यात मंगेश बुजरा पण त्याची तत्त्वे प्राणपणे सांभाळणारा आणि त्यासाठी लढणारा होता. त्याला काही विशेष संवाद कौशल्य नव्हते आणि पण एखादी गोष्ट न बोलता कृतीतून दाखवणे हे त्याला चांगले जमायचे. मंगेश त्याच्या मेहनतीच्या आणि बौद्धिक संपदेच्या जीवावर गोष्टी साध्य करायचा.

पण जेव्हा तुषार त्याच्या टिम मध्ये आला त्यामुळे तेथील वातावरण बदलले. सुरवातीला दोघांत मैत्रीपूर्ण व खेळीमेळीचे वातावरण होते. पण जसा- जसा त्यांच्या दोघांतील फरक स्पष्ट होत गेला तसे दोघांत ताण तणाव निर्माण झाले. एखादी समस्या तुषार आणि मंगेश त्यांच्या विचारसरणी नुसार दोन वेगवेगळ्या प्रकारे सोडवायचे. त्यात मग दोघ आपले विचार हिरीरीने मांडायचे आणि दुसर्‍यांना पट‍वून द्यायचे की आपलीच समस्या सोडण्याची पद्धत कशी बरोबर आहे. यात कोणाचे जास्त बरोबर यावर वादा वादी व्हायची.
आणि बरेच वेळेस तुषार त्याच्या संवाद कौशल्याचा वापर करून जिंकायचा. पण मंगेशची पद्धत बऱ्याच वेळेस स्वयंपूर्ण असायची आणि चातुर्य पूर्ण संवादात मंगेश हरायचा. त्यामुळे त्याच्या दोघांत दुरावा वाढला होता.

कार मध्ये बसल्यावर तुषार ने सांगीतले. तुला ते टिम प्रकरण लक्षात असेल. त्यात आपला खूप वाद झाला होता आणि आपल्यात भांडणाची ठिणगी पडली होती आणि आपण एकमेकाचे अघोषित शत्रू झालो होतो.

हो त्या वेळी एका महत्त्वाच्या कामातून मंगेशला काढून टाकण्यात आले. मंगेशला वाटले की तुषारच्या सांगण्यावरून त्याला काढण्यात आले आहे. त्याने हे आरोप तुषार वर लावले. पण तुषारने आरोप सरासर अमान्य केले. त्यामुळे आपल्या मधील संवाद खुंटला होता. त्या प्रकरणात तू माझ्यामुळे नाही तर आपल्या मॅनेजर सौरभ मुळे आपल्यात फुट पडली होती. सौरभने आपल्यात जाणीव पूर्वक दरी निर्माण केली कारण आपण जरी भांडत असलो आणि आपल्या समस्या सोडवायच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी त्या दोन्ही पद्धती खूपच चांगल्या होत्या आणि आपण एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी त्या आपण जास्त अभ्यास करून व्यवस्थित रित्या सादर करायचो. त्यामुळे सौरभच्या विचाराकडे सगळ्यांचे दुर्लक्ष व्हायचे. आणि सौरभला असे वाटायचे की त्याची टिम वरील पकडीला तडे जातात की काय. ही भीती त्याला ग्रासली होती त्यामुळे त्याने आपल्यात फुट पडली आणि आपल्यात भांडण लावल्या मुळे आपण दुरावलो आणि त्याचा फायदा मात्र सौरभला झाला. त्याची टिम वरील पकड मजबूत झाली.
तुला माहीत आहे का? आपली विचारसरणी जरी वेगळी असली तरी आपला उद्देश संवाद साधून समस्या मार्गी लावणे असा होता. पण काही लोकांना ती समस्याच सोडवायची नव्हती. कारण त्याच्यात त्यांचे हितसंबंध गुंतलेले होते. यात राजकारण झाल्यामुळे आपल्याच त्याचे नुकसान भोगावे लागले. कारण जेव्हा आपण वादविवाद करायचो त्यावेळेस आपण-आपले ठाम मत मांडायचो. त्यामुळे नकळत आपल्या विचारांना मुक्त उजेड मिळायचा आणि आपल्या पद्धती आणि विचार तावून-सुलाखून निघायचे. मंगेश मी तुझ्याशी भरपूर वादविवाद केले आहेत पण मा‍झ्या मनात तुझ्या विषयी काहीच आकस नव्हती. आपल्या मैत्रीची आठवण मला आधीपेक्षा आता जाणवत आहे. कारण टाईमपास मित्रा पेक्षा आपल्या मध्ये सकारात्मक बदल घडवणारा विरोधक कधीही चांगला.

तुषार तुला माहिती आहे, माझ्या उणीवा भरून काढण्यात मला तुझी खरच मदत झाली. मला माहीत आहे. लोकांशी संपर्क साधण्याची कला आणि आपला मुद्दा व्यवस्थित मांडण्याची कला वाढण्यास मला तुझी खरच मदत झाली. कारण मी आधी पासून बूजरा आणि आत्मकेंद्रित होतो. पण जो पर्यंत तुमच्या मतांना आव्हान देणारे कोणी देत नाही तो पर्यंत तुमच्या मतांची परीक्षा झालेली नसते. त्यामुळे मा‍झ्या विचारात आणि कृतीत फरक पडायचा पण तुला हरवायच्या नादात मी या दोन गोष्टीवर मात केली कारण तुझ्या रुपात मा‍झ्या समोर आव्हान देणारे कोणी तरी आले होते. ज्याकडे स्वत:ची अशी प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघायची दृष्टी होती. आणि तुला आव्हान देण्यासाठी मी मा‍झ्यात सुद्धा भरपूर सकारात्मक बदल घडवून आणले.

मंगेशला जाणवले की तुषारचे घर जवळ येत आहे. मंगेश म्हणाला की मित्रा आपण दोस्त झालो, चढाओढ केली, भांडलो आणि मैत्री सुद्धा तोडली पण तिरस्कार केला नाही. त्यामुळे तुझ्या या निरोप समारंभाच्या पार्टीत मी आपली मैत्री कायम राहावी हीच सदिच्छा घेऊन आलोय. या व्यतिरिक्त माझा काहीही उद्देश नव्हता. आणि तुषार तू माझा कायमच चांगला मित्र राहशील याची मी ग्वाही देतो आणि निघतो. तुषार मंगेश कडे बघून एक स्मितहास्य केले आणि तो घरी जाण्यास वळला.
x

Wednesday, October 17, 2018

कविता - कातर क्षण


ओथंबलेले क्षण का स्मरतात
स्मृती उगाचच गर्दी करतात

जुन्या आठवणी कुरतडतात

हळुवार क्षणी मात्र डोकावतात
आठवणी आल्या चोर पावलांनी
हृदयाचा ठोका चुकला क्षणांनी

दगा दिला डोळ्यातील आसवांनी

दूर तरी बांधलो प्रेमाच्या नात्यांनी
हाक दिली हृदयस्थ भावनांना
प्रतिसाद नाही आला शब्दांना

विझावतो आतल्या तीव्र उद्रेकांना

साद घालतो आपल्याच लोकांना
x

Thursday, September 20, 2018

Textual description of firstImageUrl

Blog : Photography - random clicks


Photography: Magical Sunset view from my balcony

Photography: Another Sunset view from my balcony

Photography: Stunning sunset view from my balcony


Photography: Cloud seen from my balcony

Photography: Older women in palkhi at Lenyadri cave

Photography: Beautiful road view from Lenyadri cave

Photography: View from Mumbai - Pune Expressway

Photography: Sunset view

Saturday, September 1, 2018

Textual description of firstImageUrl

चित्रपट परिक्षण – tc.gn – टेक केअर गुड नाईट - साइबर गुन्हा आणि वास्तव
चित्रपटाची सुरुवात एका व्याखाना पासून सुरू होते. सचिन खेडकर हा व्याखान निमंत्रित म्हणून त्यांच्या एक मित्राची गोष्ट प्रेक्षकांना सांगतो. खरे तर ती कथा त्याची स्वत:चीच असते. हीच चित्रपटाची कथा आहे. या कथेचा नायक अविनाश पाठक (सचिन खेडेकर) आहे. हा एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर असतो. पण नवीन तंत्रज्ञाना सोबत त्याला जुळवून घेता येत नाही म्हणून तो सेवानिवृत्ती घेण्याच्या विचारात असतो. आसावरी(इरावती हर्षे) त्याची पत्नी एक शैक्षणिक सल्लागार आहे. पण तिला नवीन पिढी सोबत जुळवून घ्यायला अवघड जात आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आहे. त्यांची मुलगी सानिका (पर्ण पेठे) बारावीला कमी गुण मिळाल्यामुळे कॉमर्सला असते. अविनाश घरच्यांचा विरोध पत्करून निवृत्ति घेतो. ऐच्छिक निवृत्तिसाठी त्याला ५० लाख मिळतात.

अविनाशला निरोप देण्यासाठी त्याचा मित्र आणि मित्राचे कुटुंब आले असते. मित्राची मुलगी आणि सानिका या चांगल्या मैत्रिणी असतात. सचिन खेडेकरांनी भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. नवीन तंत्रज्ञाना शिकण्यासाठी विरोध करणारा बाप. तंत्रज्ञाना साठी सर्वस्वी मुलांवर अवलंबून असलेला बाप छान रंगवलेली आहे. मुलीला मोकळीक आणि मुलाला अति-मोकळीक देणारा बाप अभिनयातून डोकावतो. इरावती यांचा ठीकठाक अभिनय आहे. त्यांच्या अभिनयाचे एक दोन वेळेस सर्व साधारण प्रकटीकरण झाले आहे. त्या काही विशेष काही प्रभाव पाडू शकल्या नाहीत. पण पर्ण पेठेने चांगला अभिनय केला आहे. एकांगी मुलगी जिला प्रियकर नाही. नटण्या-मुरडण्याची सवय नाही. एकच मैत्रिण आहे. एखादी विशेष आवड नाही फक्त दिवसरात्र इंटरनेट वर गप्पा मारणे यात तिचा दिवस जात असतो.

ऐच्छिक निवृत्तिच्या भाषणात अविनाश सांगतो की त्याच्या अपूर्ण इच्छा, आवड पूर्ण करण्यासाठी तो आत्ता निवृत्ति नंतर खास वेळ देणार असतो. त्याची पहिली इच्छा तो युरोप पर्यटन करून करतो. आणि तिथेच त्यांच्या घरावर वाईट घटनाची मालिका सुरू होतो. अविनाश मोबाइल बंद पडतो. त्यात अविनाशने त्यांच्या मित्राला ५ लाखांचा धनादेश बँकेत वटत नाही. बँकेत जाऊन त्यांना माहिती मिळते की अविनाशच्या खात्यातील ४५.५ लाख ऑनलाईन हस्तांतरीत झाले आहेत. हे ऐकून त्यांना जबरदस्त धक्का बसतो. त्या धक्यातून सावरत असताना सानिका सांगते खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यात प्रत्येक जण एकमेकाला दोष देत असतो. पालकांना आपल्या पाल्यांना आपण काय संस्कार देले यांची जाणीव होते. सानिकाचा एक व्हिडिओ इंटरनेट वर व्हायरल होतो. सानिकाच्या मैत्रिणीचा गर्भपाताचा निर्णय अंगलट येतो आणि मैत्रिणीचा प्रियकर पळून जातो. तिला शेवटी दवाखान्यात अॅडमिट व्हावे लागते. त्यामुळे अविनाशचा मित्र खचतो कारण त्यांनी मुलीला बरेच निर्बंध घालून सुद्धा असे हाल सोसावे लागत असतात. निर्बंध हे नात्यात मिठा सारखे असतात. जास्त झाले तर नात कडू होत आणि कमी झाले तर नात अळणी होत. आपलं माणूस जर आपल्या पासून दूर झालं असेल तर तो कधी दूर गेला हे त्यांच्या डोळ्यातून दिसणार्‍या भावातून जुन्या फोटो मधून हुडकून काढता येते. पालकत्व ही एक तारेवरची कसरत आहे.
पहिला भागात कथेचा वेग खूप चांगला आहे. फक्त अविनाश आणि सानिका यांचे पात्र चांगल्या रित्या उमलण्यात आली आहेत. इतर पात्रांना जास्त वेळ दिला नाही. यात आदिनाथ कोठारेने एका साइबर गुन्हेगाराची व्यक्तिरेखा साकारली आहे. या पात्राला आणखी थोडा वेळ देऊन रंगवायची गरज होती. संस्कृती बालगुडे यांची भूमिका खूप छोटी आहे आणि जास्त प्रभाव पाडत नाही. महेश मांजरेकरांनी पोलीस पवार यांचे प्रामाणिकपणे सादरीकरण केले आहे. पवार हा काही सिंघम पोलीस नाही त्याला त्याच्या मर्यादा माहीत आहेत. अचूक टायमिंग साधत ते अवघड प्रसंगात सुद्धा कॉमेडी करतात. मांजरेकरांनी व्यक्तिरेखेचे छान बेअरिंग पकडले आहे. दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट असला तरी नवखेपण जाणवत नाही. कथा उत्तम फुलवण्यात ते यशस्वी झाले आहेत. पण काही मूलभूत चुका सुद्धा झाल्यात.

कथा उत्तम आहे. पटकथा सुद्धा उत्तम आहे. संवाद, सादरीकरण, चित्रीकरण छान आहे. दुसर्‍या भागात कथा थोडी मंदावते. पण थोड्या वेळाने परत ट्रॅक वर येते. मराठीत पहिल्यांदा सायबर क्राइम वर सिनेमा येत आहे. एकाच सिनेमात आपल्याला मोबाइल सिम हेराफेरी, इंटरनेट वरील खराब व्हिडिओ, ईमेल फिशिंग, साईबर गुन्हे, नवीन आणि जुन्या पिढीतील वेगवेगळे प्रश्न आणि त्यांच्यातील अंतर, बेरोजगारी, कमी वेळेत पैसा कमावण्याची मानसिकता आणि तरुण पिढीचे एकाकीपणा यावर भाष्य करतो. अविनाश आणि त्याचे कुटुंब एकमेकाच्या मदतीने आणि पोलीसाच्या मदतीने ५० लाख कसे मिळवतात आणि त्यांच्या आप-आपसातील नातेसंबंधाचा तिढा कसा सोडवतात हे दुसर्‍या भागात बघताना उत्कंठा वर्धक ठरते. शेवटी सानिकाचा संवाद आहे की तुम्ही  व्याखाना मध्ये 
कथा ही दुसर्‍याची न सांगता स्वत:ची सांगा. त्यामुळे मला प्रेक्षकात बसता येईल आणि मी ज्या चुका केल्या त्या परत करू नका हे सुद्धा सांगता येईल. अविनाश सांगतो मी दुसऱ्या वेळेस प्रयत्न करेन. फास्टर फेणे किंवा द्रीशॅम यासारखे उत्तम प्रतीचे उत्कंठा वर्धक चित्रपट आधीच येऊन गेले आहेत. चित्रपट बघताना आपल्याला काही प्रश्न पडतात पण ते दुर्लक्ष केलेस एक चांगला सिनेमा आपल्याला बघायला भेटेल. 
"थोडक्यात नवीन दमदार कथानक, योग्य दिग्दर्शन, चांगला अभिनय, रहस्याचा तडका, चांगल्या उपकथानकाची जोड, नात्याची तरल उकल, उत्तम निवडलेली कास्टिंग, उत्तम अभिनय, आणि एक सुद्धा गाणं न टाकता प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्याची कला यामुळे या चित्रपटाला मिळतात २.५ स्टार. चित्रपट कुटुंबासोबत एकदा जरूर बघण्यासारखा आहे."


Saturday, August 11, 2018

कविता : ध्यास


अवचित भेट...
चित्त सैरभैर...
जाणीवां थेट....
भाव सैरवैर...

आस सोबतीची...
ग्लानी मनाची...
मैत्री विचाराची...
भाषा प्रेमाची...

पडझड कुटुंबाची...
घुसमट आत्माची...
धडपड 
नात्याची...
फरफट जीवाची...

बुद्धिबळाचा डाव...
खोलवर घाव...
काळाचा घाला..
प्रारब्ध झेला...

गृहीतकाचा तिढा...
कार्याची दखल...
समस्येचा वेढा...
प्रश्नाची उकल...

ध्यास नवा...
संघर्ष हवा...
इच्छेचा प्रकाश...
मोकळे आकाश...

Monday, July 30, 2018

कथा : मैत्रा - भाग २

कथा : मैत्रा - भाग १

प्रकरण – काळ


मैत्राला सत्य जाणून घ्यायचे होते त्यामुळे मैत्रा आणि मिहीर गाडीने जळगाव जवळच्या त्याच्या गावी जायला निघाले. गावातील वाड्यात पोहचले. चिरेबंदी वाडा, खानदानी कुटुंब आणि छान माणसे यांनी वातावरण भरून गेल होत. तिथे त्यांना पाहून मिहीरच्या आईला अति आनंद वाटला. सगळे त्यांच्या आकस्मिक भेटण्याने भारावून गेले. तिथे तिला मिहीरचे सगळे कुटुंबच भेटले. मिहीर आला म्हणल्या नंतर सगळेच त्यांच्या मायेची माणसे जमा झाली. विशेष करून आई, बहिण ‘एकता’, ‘सई’ वाहिनी, पुतण्या ‘आकाश’ आणि इतर मंडळी हजर होती. ‘एकताने’ सांगीतले तिच्या सासूबाईला सगळे प्रेमाने “अक्का” म्हणतात. सगळा वाडा मैत्राला दाखवला. “एकता” मिहीर पेक्षा ३ वर्षानी मोठी होती. अक्काच्या खोलीत मिहीर आणि मैत्राचा फोटो बरेच काही सांगून जात होता. कुटुंब बघून मैत्राला चांगले वाटले पण मिहीर कुटुंबा पासून लांब का आहे यांचे कोडे उलगडले नव्हते.

मग घरचे भावनिक वातावरण शांत झाल्यावर मैत्राने अक्काला विनंती केली की त्यांच्यात हा दुरावा कशासाठी निर्माण झाला याची माहिती सांगा. अक्काने सांगीतले की १२ वर्षा पूर्वी घडलेली कथा सांगितली. आमचे कुटुंब गरीब आणि शोषितासाठी काम करते. गरजू लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडते. मिहीरच्या वडीलांना सगळे प्रेमाने “हरिभाऊ” म्हणतात. गावाचे दमदार व्यक्तिमत्व. सगळे गाव त्यांचा आदर करायचे. मी सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून आणि शोषिताना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणात माझा चंचु प्रवेश झाला. त्या पाठोपाठ मा‍झ्या कडे बरीच लोक अडलेले नडलेले कामे घेऊन यायचे आणि आज सुद्धा येतात. त्यासाठी मला लोकेशची म्हणजे मिहीरचा मोठा भाऊ याची मदत व्हायची. त्यामुळे तो सुद्धा राजकारणात आला. आणि मला हत्तीचे बळ मिळाले. लोकेश फक्त मिहीर पेक्षा आठ वर्षांनी मोठा होता. लोकेश रांगड्या शरीरयष्टीचा, लढाऊ होता. गरीब लोका बद्दल विशेष ममत्व होते. सगळे नातेवाईक सांगायचे राजकारणात पडू नका. राजकारण म्हणजे न सुटणारा बुद्धिबळाचा खेळ आहे. त्यात कधी आपला विजय होतो तर कधी विरोधकांचा. पण पूर्णपणे खेळ आपण जिंकलो असे होत नाही. त्यात एकमेकांवर कुरघोडी करणे चालू असते. जसे तुमच्या चांगल्या कामाचा दरवळ पसरतो तसे तुमचे प्रतिस्पर्धी सुद्धा वाढत जातात.

आमच्या गावातून मोठी नदी वाहते. गावातील काही मंडळी नदी पात्रातील वाळू उपसण्याचा मोठा व्यवसाय करतात आणि तेथील ठेकेदार बेकायदा वाळू उपसा करून ‘वाळू सम्राट’ झाले होते. तिथे लक्ष्मण नावाचा प्रमुख ठेकेदार होता. मी ज्यावेळेस निवडणुकीला उभा टाकले त्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप घाबरवण्याचा प्रयत्न केला. कारण सगळी कडे त्यांची माणसे होती. प्रचारा वेळेस त्यांची माणसे आमचा पाठलाग करायची. एक वेळेस तर मी, लोकेश असे प्रचारा वेळेस गेलो असताना त्यांची गाडी आमच्या मागे हात धुवून आमच्या पाठीमागे लागली होती. आम्ही तेथून कसे तरी निसटलो. चांगल्या कामाचे फळ मला मिळाले आणि मी निवडणूक जिंकली. मी निवडून आल्यावर बेकायदा वाळू उपसण्यावर लगाम लावला. जसे बिळात पाणी गेल्यावर नाग बाहेर येतो त्याच प्रमाणे लक्ष्मण आमच्या विरोधात उभा टाकला. त्याचा एका प्राणघातक हल्यात माझा मोठा मुलगा मारला गेला. मिहीरचा आपल्या भावावर खूप जीव असल्यामुळे त्याने हे राजकारण सोडायचा हट्ट केला. पण मी ज्या कारणामुळे राजकारण केले ते मी सोडू शकले नाही. परंतु लोकेश मृत्यू झाल्याचे शल्य आजही मला आणि मिहिरला आहे. मोठ्या मुलाचा असा दुर्दैवी अंत बघून मिहीरच्या वडीलांनी कायमचे अंथरून पकडले. त्याचा परिणाम मिहीरवर होऊन तो वयाच्या १८ वर्षी घरातून निघून गेला.

बुद्धिबळाचा डाव...
झाला खोल घाव...
काळाचा कठोर घाला..
नियतीचा दोष झाला...प्रकरण – पाऊल


मिहीर आणि मैत्रा तिथे एक आठवडा गावात राहून वापस शहरात गेले. तिथे मिहीर जास्त काही बोलला नाही पण त्याच्या मनावरील अढी कमी होईल असे वाटत होते. तो सगळ्यांशी व्यवस्थित बोलला पण आईशी जास्त काही बोलू शकला नाही. पण मैत्राने सगळ्यांशी चांगले बोलून मन जिंकले होते. मैत्राचे आणि कुटुंबाचे दर आठवड्याला फोन वर बोलणे व्हायचे आणि हळूहळू मिहीरचा राग शांत होत होता.

आणि एक दिवस ती गोड बातमी आली की मैत्रा गर्भवती आहे. या बातमीची मिहीर आणि मैत्रा २ वर्षा पासून वाट बघत होते. मिहीरचा आनंद गगनात मावत नव्हता. अखेर ती गोष्ट सत्यात उतरली होती. आनंद अशी गोष्ट आहे की दुखऱ्या नसेवर फुंकर मारते. मैत्राने अक्काशी बोलून ही बातमी कळवली. आणि संपूर्ण कुटुंब आनंदात डुबून गेले. पहिले ५-६ महिने मैत्राने ऑफिस काम केले पण त्यानंतर डॉक्टराने आराम करायला सांगीतला. आराम करण्यासाठी अक्काने आणि मैत्राची आई सुद्धा तिला बोलवत होती. पण मैत्रा अक्का कडे गेली कारण तिला नात्यातील अंतर कमी करायचे होते. याला मिहीर काही विरोध करू शकला नाही.

तिला गावात राहिल्या वर अक्काचे काम समजले. गरजू लोक अडले नडले काम घेऊन यायची. त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणे गरजेचे होते. त्यांचा पूर्ण दिवस लोकांचे प्रश्न सोडवण्यात जायचा. सासुबाई NGO सुद्धा चालवायच्या. त्यात गरीब मुलांना शिक्षणाची सोय होती. एकदा मैत्राने अक्काला विचारले तुम्हाला लोकांना मदत करून काय मिळते. तर त्यांनी सांगीतले की आपल्या मदतीमुळे कोणी गरजू मुलाची मदत होऊन तो शिक्षण शिकत असेल तर मी समजेन माझा लोकेशच शिकतोय. मैत्रा अक्काचे काम फार जवळून बघत होती. त्यांच्या कामामुळे ती खूपच प्रभावित झाली. त्यांच्या खोलीतील मिहीर आणि मैत्राच्या फोटो बद्दल त्यांनी सांगीतले की त्यांना मैत्रा बद्दल आधी पासून माहीत आहे. मिहीर वर त्यांचे आधी पासून लक्ष होते. त्यांच्या खोलीत मिहीरच्या लग्नातील फोटो होता. बाई म्हणाल्या की आपले माणूस नाराज झाले म्हणून काही नातं तोडायचे नसते. यथावकाश मैत्राची प्रसूती झाली आणि तिला मुलगा झाला. त्याच नाव “श्रीरंग” ठेवण्यात आहे. त्यानंतर मिहीर तिला मुंबईला घेऊन गेला.

तिथे “सुभद्रा” अक्काचे विरोधक स्वस्थ बसून नव्हते. त्यांना काहीही करून अक्काना हरवायचे किंवा त्यांचे समाजातील महत्त्व कमी करायचे होते. पण आत्ता त्या खुप थकल्या होत्या. त्यांना म्हणावी तशी साथ भेटत नव्हती. गावातील लोकांना त्याचा खुप त्रास व्हायचा. बाई होत्या म्हणून ते दचकून असायची. अक्का नसत्या तर त्यांचा गाव गुंडा करून खुप छळ झाला असता. आत्ता सुद्धा काही लोक गुत्यावरील दारू पिऊन हैदोस घालायची. पण बाईचे कार्यकर्ते त्यांना आवरायचा प्रयत्न करायची. अश्याच असंघटीत आणि वेठ बिगार लोकांची पिळवणूक व्हायची.

पण अक्काचे समाजकार्यातील काम तिला स्वस्थ बसू देत नव्हते. तिला अक्काचे एक स्त्री म्हणून कौतुक तर होतेच पण एक धडाडीची, कर्तव्य दक्ष व्यक्ति म्हणून आदर होता. अशी खूपच कमी लोक तिने बघितली होती. तिच्या जवळपासच्या दुनियेत अशी लोकच नव्हती दुसर्‍या साठी झटणारी. आपली प्रगती आणि आपण हेच तिची आज पर्यंतची वाटचाल होती. तिला जीवनाचा असा दृष्टीकोन याचा साक्षात्कार पहिल्यांदाच झाला. तिला मनातून वाटले की आपण सुद्धा समाज उपयोगी काही तरी करायला पाहिजे. तिला पहिल्यांदा स्वत:ला वाटले की अक्काचा वारसा कोण चालवणार. शेवटी तिने ठरवले की आपणच अक्काचा वारसा पुढे चालवायचा. नोकरी तर आत्ता पर्यंत केली आहेच. जर तिथली समाजसेवा जमली नाही तर परत नोकरी सुरू करता येईल. पण त्यातून आपल्याला दुसर्‍याला काहीतरी मदत करता येईल आणि शिकता येईल.

गृहीतकाचा तिढा...
कार्याची दखल...
समस्येचा वेढा...
प्रश्नाची उकल...


प्रकरण – सुरुवात 


मैत्राला माहीत होते की मिहीरचा याला कडाडून विरोध होईल. कारण मुंबई सारख्या शहरातून सुखवस्तू कुटुंबातून आणि चांगल्या हुद्याची नोकरी सोडून समाजकार्य करायचे म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हती. मिहीरला पहिल्यांदा वाटले की तिला अक्का बद्दल सहानुभूती असेल म्हणून मैत्रा असे ठरवत असेल. मिहिरने तिला विचारले की “तुला अक्काचा वारसा का पुढे न्यायचा आहे?”

“कारण अक्काच्या कामामुळे मी प्रभावित झाले आहे” – मैत्रा

“मग तुला फोन वर जितकी मदत करता येते तेवढी कर. जास्त काही फंदात पडायची गरज नाही.”

मी पूर्वी राजकारणाची फळ भोगली आहेत. असा हटहास चांगला नाही.

“मला माहीत आहे त्यासाठी तू १२ वर्ष पळत आहेस. पण त्यांचा वारसा कोणी तरी चालविला पाहिजे.”

“मी पळत नाही. पण मला ते दुख पेलवले नाही. डावात हारजीत ठीक आहे पण जीव जात असेल तर काय करायचे अशा कामाचे”

“पण जीव तर कुठेही जातो. ती जोखीम तर कुठेही असते. ही वेळ अक्काला साथ द्यायची आहे. वारसा जर मी मार्गा वर चालू शकले तरच मार्गक्रमण करता येईल. ”

मैत्राच्या हट्टा पुढे मिहीरचे काही चालू शकले नाही आणि त्याने प्राणाची जोखीम टाळण्याच्या अटी वर परवानगी दिली.” पण त्याला मैत्राची काळजी लागून राहिली होती.

अक्काने खुल्या दिलाने स्वागत केले आणि त्यातील धोका विशद केला. अक्काने तिला आपल्या पंखाखाली घेतले आणि तिचे खास प्रशिक्षण सुरू केले. अक्का प्रत्येक निर्णय घेताना मैत्राला मत विचारायची आणि स्वत:चे मत मांडायची. मग त्या मताची पार्श्वभूमी समजावून सांगायची. काय चूक आणि काय बरोबर याचा ऊहापोह व्हायचा. मग त्यातून निर्णायक मत तयार व्हायचे. NGOचे कार्य पद्धती अक्काने तिला समजावली. मैत्रा जसे कार्य समजावून घ्यायची तसे ती त्यात जास्त स्वारस्य घेत होती. तिला कष्टकरी लोकांची दुःख जवळून बघायला मिळाले. तिची तारेवरची कसरत व्हायची. नवरा मुंबईत आणि काम गावात. मुंबई ते गाव अश्या तिचा बऱ्याच वेळेस प्रवास व्हायचा. लहान मुलांची काही काळजी नव्हती कारण घरात बरीच माणसे होती काळजी घ्यायला.

लक्ष्मण ठेकेदार यांची मधून खटपट आणि त्रास चालूच असायचा. दारूच्या गुत्यावर त्याच्या गुंडांचा उपद्रव खूपच वाढला होता. गावातील लोक हतबल झाली होती. पण तो त्यांना काही ऐकायचा नाही. मैत्रा गावातील एका कुटुंबाचा समस्या सोडवण्यासाठी गेली होती. तिथे तिला एका माणसाने हटकले.

“बाई का आलात या दलदलीत. गप-गुमान मुंबईला वापस जा. यातच तुमचे भले होईल.”

“तुम्ही कोण आहात मला मुंबईला परत जायला सांगणारे.”

“बाई तुम्हाला लवकरच प्रचीती येईल. मी कोण आहे” असे म्हणून ती व्यक्ति निघून गेली.

मैत्राने सोबत असलेल्या महिलेला विचारले की हे गृहस्थ कोण होते. त्यांनी हा गावातील नामांकित गुंड “लक्ष्मण ठेकेदार” असे उत्तर दिले. लक्ष्मणच्या चेहर्‍यावर खुनशी भाव होते. राकट चेहरा.. उत्तम शरीरयष्टी... भेदक नजर... चेहर्‍यावर घाव.. आणि जबरदस्त संवाद फेक.. तिथे लक्ष्मण आपल्या गुंडा सोबत आला होता. तिथे सुद्धा तो अरेरावी करत बोलत होता. तिला लक्ष्मण माहीत नव्हता आधी नाहीतर मैत्राने त्याला समर्पक उत्तर दिले असते. मैत्राने हा प्रसंग अक्काला सांगीतलं. अक्का म्हणाली की आत्ता तिला अशा प्रसंगाची तयारी ठेवावी लागेल.

एक दिवस मैत्राने ठरवले की दारूच्या दुकाना विरुद्ध लढा द्यायचा. तिने आपल्या परीने गावातील महिलांना गोळा करायला सुरुवात केली आणि गाव गुंडा विरुद्ध आवाज उठवायचे ठरवले. पण सरकार दरबारी दारूचे बेकायदा दुकान बंद करण्यासाठी अर्ज देऊन सुद्धा काही होत नाही बघून तिने लढा उभारला. जिल्हाधिकारी, पालकमंत्री पासून ते सर्व अधिकार्‍यांना सांगून सुद्धा काम झाले नसल्यामुळे मैत्राने लढा तीव्र केला. मग सगळ्या महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. अक्काने या लढाईत खूप साथ दिली. मोर्चा काढून सुद्धा काही परिणाम होत नाही म्हटल्या नंतर तिने मतदान घेऊन दारू दुकान बंद करण्यासाठी जनजागृती केली. त्यात तिचे बरेच महिने खर्ची पडले. पण तिच्या प्रयत्नांना यश आले आणि तिने गावातील जवळपास ७०% महिला मतदारांना गोळा केले आणि उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करून दारू दुकान बंद करायची विनंती केली. उत्पादन शुल्क विभागा कारवाई होऊन लक्ष्मणचे दुकान बंद झाले. सगळ्यांना खूप आनंद झाला पण मैत्राला आणि अक्काला माहीत होते की ही तर फक्त सुरुवात होती.


ध्यास नवा...
संघर्ष हवा...
इच्छेचा प्रकाश...
मोकळे आकाश...


समाप्त....

Sunday, July 29, 2018

कथा : मैत्रा - भाग १

प्रकरण – भेटमैत्रा ऑफिसच्या मैत्रिणी सोबत पार्टीचा आनंद लुटत होती. शहरातील ते एक नामांकित हॉटेल होते. हॉटेल इमारतीच्या छताच्या खुल्या जागेवर होते. संध्याकाळची वेळ... छान आल्हाददायक वातावरण... मंद सुटलेली हवा... यामुळे पार्टीचा माहोल बनला होता. मैत्राच्या मैत्रिणी सोबत मस्त गप्पा टप्पा चालल्या होत्या. पार्टी आता रंगात आली होती. मैत्राच्या मैत्रिणी बोलण्यात इतरत विखुरल्या होत्या. मैत्रा तिच्या जिवलग मैत्रिण किर्ती सोबत जेवणाचा पुरेपूर आस्वाद लुटत होती.

तेवढ्यात काहीतरी पडल्याच्या आवाज आला. कोणाचा तरी धक्का लागून वेटरच्या हातातून प्लेट पडली होती. त्यामुळे एका ग्राहकाचा शॅर्ट खराब झाला होता. हॉटेलचा व्यवस्थापक वेटरला रागवत होता आणि तो ग्राहक व्यवस्थापकाला वेटरला रागावू नका म्हणून विनंती करत होता. ग्राहकाने नम्र विनंती फळाला आली आणि वेटर शा‍ब्दिक चकमकीतून सुटला. मैत्रा हे सगळे लांबून बघत होती. तिच्या लक्षात आले तो नम्र ग्राहक दुसरा तिसरा कोणी नसून तिच्याच ऑफिस मधला कर्मचारी मिहीर होता. अशी माणसे गर्दीच्या सागरात झाकले जातात, पण त्यांच्या जवळ जाताच चांगल्या गुणामुळे हिऱ्या प्रमाणे चमकतात.

मैत्रा आणि मिहीर दोघ उच्च विद्या विभूषित होते आणि मुंबईत एकाच कंपनीत काम करायचे. दोघांच्या रहाणीमानात खुप फरक होता. मिहीर हा दुसर्‍या विभागात काम करायचा त्यामुळे मैत्राला त्यांची जास्त ओळख नव्हती. पण त्याच्या बद्दल मैत्रा ने बरेच चांगले ऐकले होते. पण आजची आठवण खूपच ताजी होती. एका CSR (कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) कार्यक्रमा साठी ते दोघं एकत्र आले. मात्र मिहीरला त्यांच्या दोघांच्या विचारातील फरक लगेच जाणवला. मैत्रा प्रत्येक वेळेस तिच्या मतावर ठाम राहणारी आणि कोणत्याही परिस्थितीत भूमिका तडजोड न करणारी मुलगी होती. मिहीर मात्र परिस्थितीतून मार्ग काढणारा होता आणि खूपच भावनिक होता. पण दोन विरुद्ध स्वभावाचे माणसे एकत्र आली आणि त्यांच्या विचाराची देवाण-घेवाण होऊन ते जवळ-जवळ येत गेली. मग कामा व्यतिरिक्त बाहेर फिरणे सुद्धा हळूहळू चालू झाले. कधी-कधी कॉफी शॉप, हॉटेल किंवा प्रेक्षणीय स्थळ फिरून झाली. मैत्राला एकदा फिरायला जाताना वाटले आपल्यावर कोणी तरी लक्ष ठेवतयं. पण परत तशी घटना घडली नसल्यामुळे तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. पण वेळ जात होता त्याप्रमाणे त्यांची मैत्री घट्ट होत होती.

एकदा फिरायला गेल्यावर मैत्राने मिहीरला विचारले की तुझ्या घरी कोण-कोण असते.

मिहीर उत्तरला “सध्या तरी मी एकटाच. दुसरे कोणी नाही”

“काही भूतकाळात होते आणि मी वर्तमानात जगत असल्यामुळे सध्या मी फक्त एकटाच आहे”

मैत्रा - “तुझे शिक्षण कुठे आणि कधी झाले?”

“माझे बारावी पर्यंत शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे. त्यानंतर मी स्वत: कमवा आणि स्वत: शिका या तत्वा वर चालून मी इथ वर पोहोचलो आहे.” –मिहीर

मिहीरने त्याचे कॉलेज शिक्षण कुठे आणि कधी झाले याची माहिती सांगितली. हॉस्टेलच्या छान गमती- जमती सांगीतल्या. त्याने शिक्षण आणि नोकरी करताना त्याची कशी दमछाक व्हायची त्याच्या आठवणी सुद्धा उलगडल्या.

कुटुंबा बद्दल बोलायला मिहीर जास्त काही उत्सुक दिसला नाही आणि मैत्राने ही यावर खूप ताणले नाही. परत तो विषय तिने कधीच काढला नाही. मैत्रा मात्र तिच्या कुटुंबा विषयी भरभरून बोलत होती. तिच्या लहानपणाच्या आठवणीत ती रमून गेली. मिहीर सगळं उत्सुकतेने आणि तन्मयतेने ऐकत होता. मैत्रीत वेळ कसा जातो त्यांना कळलेच नाही. जवळपास ३ वर्ष निघून गेले आणि त्यांची मैत्री खूप घट्ट झाली आणि बघता-बघता मैत्राला मिहीर आवडायला लागला.

अवचित भेट...
चित्त सैरभैर...
भावनांना वाट...
जाणीवा सैरवैर...प्रकरण – लग्नमिहिरचे बालपण गावात झाले होते आणि मैत्रा शहरातील आधुनिक युवती होती. मिहीर मैत्राला फक्त जवळची मैत्रिण म्हणून मान्य होती. तो मैत्राशी एक जवळची मैत्रिण म्हणूनच तिच्यापाशी आपल्या भावना व्यक्त करायचा. त्याने कधी त्यापलीकडे विचार केला नाही पण मैत्राचा सहवास त्याला खूप आवडायचा. आधी कधी त्याची अशी द्विधा मनस्थिती झाली नव्हती. विचारातील फरकामुळे त्याला या प्रेमाची काही शाश्वती वाटत नव्हती. त्यामुळेच त्याने आपल्या मनाचा दरवाजा बंदच करून टाकला.

मैत्रा तर मिहीर मध्ये खूप गुरफटली होती. तिला मिहीर शिवाय काही सुचत नव्हते. ऑफिस मध्ये मिहीर, घरी असताना मिहीर सोबत बोलणे. सगळी कडेच मिहीर तिला दिसायला लागला. तिच्या विचारात सुद्धा मिहीर झळकायला लागला. ती मिहीरमय झाली. त्यामुळे कळत-नकळत मैत्रा मिहीरवर प्रेम करू लागली होती. किर्तीला सुद्धा ही गोष्ट माहीत होती. तिने मैत्राला सांगीतले की तू मिहीर जवळ मनातील भावना व्यक्त कर. पण मैत्राची इच्छा होती की मिहीरनेच तिला प्रपोज करावे. पण मिहीरला ते कधीच मान्य झाले नसते. त्यामुळे पेच निर्माण झाला होता.

पण ती समस्या किर्तीच्या मध्यस्थीने सुटली. कीर्ति दोघांची मैत्रिण होती. किर्तीला वाटायचे की दोघ एकमेकाला अनुरूप आहेत. किर्तीला मन जुळवायचे काम करायचे होते. एकदा नाष्टा करताना मिहीरने किर्तीला समजावून सांगीतले की दोघांच्या विचारसरणीत, रहाणीमानातील किती फरक आहे. त्याच्या स्वत:च्या मागे कुटुंबाची काही पार्श्वभूमी नाही. त्याच्या कडे आर्थिक पाठबळ सुद्धा नव्हते. त्याला कोणी आधारस्तंभ सुद्धा नव्हता. किर्तीने सगळी माहिती मैत्राला पुरवली. मैत्राने सगळ्या समस्या मान्य केल्या तरी पण तिचे मिहीर वरील प्रेम काही कमी झाले नाही.

मिहिरचे विचार बुरसटलेले नव्हते. तो या शहरातील वातावरणात पाण्यात जशी साखर विरघळते तसे तो वातावरणात मिसळून गेला होता. मिहिरने परत आपल्या मनाचा दरवाजा किलकिला करून मैत्रावरचे त्याचे प्रेम आणि मैत्राचे त्याच्या वरचे प्रेम यावर अभ्यास केला. प्रेमाचा झरोका बंद केल्यामुळे त्याची बेचैनी खूप वाढली होती. शेवटी त्याला मान्यच करावे लागले की त्याचेही मैत्रावर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्याने मैत्राचे विचार मान्य केले आणि शेवटी त्याच्या कडे प्रपोज शिवाय काही पर्यायच नव्हता.

मैत्रा आज खुप आनंदात होती कारण मिहीरने तिला आकस्मित रित्या लग्नासाठी प्रपोज केले होते. त्याने प्रपोज करण्या अगोदर त्याच्या बद्दल सगळी माहिती सांगितली. यथावकाश त्यांचे लग्न जमले. सगळ्यांना खूप आनंद झाला कारण मैत्रा आणि मिहीर हे एक आदर्शवत जोडपे होणार होते. शेवटी एकदाचे विवाह नोंदणी कार्यालयात लग्न लागले. मिहीरचा वयाच्या २८व्या वर्षी मैत्रा सोबत लग्न होऊन त्यांचा राजा राणीचा संसार चालू झाला. घरात दोघेच असल्यामुळे काहीही वादविवाद होण्यास वावचं नव्हता. दोन वर्षा नंतर दोघांत तिसर्‍याचे आगमन झाले.

आस सोबतीची...
दमछाक मनाची...
मैत्री विचाराची...
भाषा जिवलगाची...

प्रकरण – कुटुंब अचानक एक दिवस एक साठीतील महिला मिहीरला भेटायला आल्या. मैत्राला वाटले की कोणी तरी ओळखीची असेल. महिलेचा सोज्वळ चेहरा, कपाळावर थोड्या आठ्या, करारी आवाज मैत्राला जाणवला. ज्यावेळेस त्या बाई जवळ येऊन मैत्राचा चेहरा न्याहाळत होत्या त्यावेळेस मैत्राला खूप विचित्र वाटले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. डोळ्यातून काहीतरी सांगायचा त्या प्रयत्न करत होत्या. पण मैत्राला चेहर्‍यावर काहीच वाचता आले नाही. मिहिरच्या वागण्यात काही विशेष जवळीक जाणवली नाही. मिहीरला त्या दोन मिनिटे बोलल्या. बोलणे म्हणजे काय त्या महिलेने मिहिरला काहीतरी सांगीतले आणि मिहिरने नकार दर्शवण्यासाठी मान हलवली. जाताना त्या निराश दिसल्या. मैत्राने त्या स्त्रीबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली.

मग त्या गेल्या नंतर मिहीरला विचारले त्या काकू कोण होत्या आणि का आल्या होत्या? मिहिर म्हणाला त्याचं नाव सुभद्रा आहे म्हणजे तुझ्या सासूबाई होत्या. मैत्राला जबरदस्त धक्का बसला. मैत्राला काय बोलावे हेच सुचेना. आत्ता गेलेल्या महिला दुसर्‍या तिसर्‍या कोणी नसून तिच्याच सासूबाई होत्या. आत्ता तिला कोडे पडले की आपल्या आईशी हा माणूस असा अलिप्त का वागला असेल? तिच्या मनात त्यांच्या बद्दल विचाराचे थैमान सुरू झाले. तिला आठवले मिहिरने तिला कधीच सासूबाई बद्दल सोडा कुटुंबा बद्दल सुद्धा सांगीतले नव्हते. ही अशी अचानक सासूबाईची भेट आणि मिहीरचे वागणे तिच्या काही पचनी पडत नव्हते. बरं त्यांनी सुद्धा आपली ओळख सांगीतली नाही की मी मिहीरची आई आहे. एवढ्या दिवसाच्या संसारात आणि लग्ना अगोदरच्या ओळखीत एकदा सुद्धा मिहीरने आईचे नाव काढले नाही. तिला काय गौडबंगाल आहे काहीच कळत नव्हते. मिहीरने कंपनीतील ओळखीपासून ते लग्ना पर्यंत कधीच नाव काढले नाही तेही आई असून सुद्धा. ऐकावे ते नवलच आणि बघावे ते नवलच. किती ही लपवले तरी आपल्या माणसा बद्दल आपुलकी आणि प्रेम डोळ्यात आणि वागण्यात दिसतेच. आणि तेच तिच्या सासूबाई डोळ्यातून सांगत होत्या.

मैत्राने मिहीरला या सगळ्यांचा खडसावून जाब विचारला. महत्त्वाची गोष्ट का लपवली यावर मैत्राने आगपाखड केली.

मैत्रा – “मिहीर तू मला विनाकारण फसवले आहेस? का असा वागलास मा‍झ्याशी?”

मिहीर – “मी तुला माहिती दिली नाही. पण मी तुला फसवले नाही.”

मिहीर – “माझे कुटुंब जळगावच्या एका तालुक्याच्या ठिकाणी राहते. माझे शिक्षण तिथेच झाले. माझे मा‍झ्या घरच्या सोबत पटत नसल्या मुळे मी त्यांच्या पासून वेगळा राहतो. मी त्यांना मागेच १० वर्षा खाली सोडून आलोय. आत्ता माझा त्यांच्याशी काहीच संबंध नाही. आणि मी हे सोडून काहीही लपवलेले नाही. आणि यामुळे तुला काय फरक पडणार आहे. तू तर आधुनिक आहेस आणि तुला सासू असली काय नसली काय फरक पडणार आहे? त्यांचा आपल्या संसारात काहीच अडसर नाही.”

मैत्रा – “हे तुला मला आधी सांगीतले असते तर बरे झाले असते. आणि तू तुझ्या जन्मदात्री आईला कसे काय विसरलास?”

“त्या इथे कशासाठी आल्या होत्या? काय बोलल्या.”

“त्या मला इथे भेटायला आल्या होत्या आणि समजावून सांगण्यासाठी की घरी कधी तरी येत जा?”

“मला माहिती नाही ते आधी त्यांना परत बोलवून घे आणि ठीक ओळख करून दे.”

मिहिरने त्यांच्या आईला फोन लावला तर त्या गावी परत निघाल्या होत्या.

कुटुंबाची पडझड...
मनाची घुसमट...
नात्याची धडपड...
जीवाची फरफट... 

Saturday, July 21, 2018

Textual description of firstImageUrl

ब्लॉग : तीन क्रीडारत्न

मागचे दोन आठवडे खेळाच्या बाबतीत खूपच वैविध्यपूर्ण होते. काही सुपरस्टार खेळपट्टी वर उदयाला आले आणि काही सुपरस्टार उत्तुंग कामगिरी करण्या अगोदरच विरघळले. पण काहीनी आपली जबरदस्त छाप सोडली आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकाची मन जिंकली आणि कृतीतून आदरच काय हृदय सुद्धा जिंकले. मला त्यातील तीन ठळक उदाहरण दिसतात.

“हिमा दास” हिने IAAF संघटनेच्या वीस वर्षा खालील ४०० मीटरच्या जागतिक स्पर्धेत भाग घेऊन स्वर्ण पदकाची कमाई केली. तिने पदक मिळवणारी भारतातील पहिली महिला बनून इतिहास रचला आहे. तिने टेम्पेरे फिनलंड इथे ही कामगिरी साकारली. हिमा दासने ४०० मीटर पार करण्यासाठी फक्त ५१.४६ सेकंद घेतले. तिची कामगिरी ही ऐतिहासिक तर आहेच पण भारतीयांना अभिमानास्पद वाटणारी आहे. त्यासाठी हिमा दास यांचे मनापासून अभिनंदन.

पदक स्वीकारण्या अगोदर राष्ट्रगीताची धून लावली गेली त्यावेळेस हिमा दासचे हृदय उचंबळून आले आणि तिने स्वत: राष्ट्र गीत म्हणता-म्हणता तिचे अष्टसात्विक भाव जागृत होऊन अश्रु रूपाने प्रकट झाले. ज्या देशासाठी आपण प्रतिनिधित्व करतो त्या भारत देशासाठी आपण काहीतरी करू शकलो ही कृतज्ञता वाटली. साधे पण परिणामकारक वर्तन फक्त एक संवेदनशील मनुष्यच करू शकतो. आपल्याला प्रेक्षा ग्रहात राष्ट्रगीत ऐकायला त्रास होतो. एक खेळाडू म्हणून तिने वेगळीच उंची गाठली आहे पण माणूस म्हणून तिचे वेगळेपण तिने सिद्ध केले आहे. तिच्या वागण्यातून तिने एक सशक्त आणि राष्ट्राभिमानी खेळाडूची वाटचाल होत आहे हे दाखवून दिले. हिमा दासला माझा सलाम.

"किलीअन म्बाप्पे" या तरुण, तडफदार, युवा आणि 19 वर्षीय खेळाडूने फुटबॉल विश्व चषकावर नाव कोरले. त्याची चपळाई वाखाणण्या जोगी आहे. तो चित्त्याच्या चपळाईने विरुद्ध संघावर आक्रमण करतो. आलेल्या संधीचे सोन्यात रूपांतर करतो. तो फुटबॉलच्या क्षितिजावर उभरता सितारा आहे. त्याने विश्व चषकात खेळताना पेले सारख्या महान खेळाडूचा कित्ता गिरवत त्यांच्या काही पराक्रमाची बरोबरी केली आहे. नेमार, रोनाल्डो आणि मेस्सी यांच्या समोर दमदार कामगिरी करून आपण येणार्‍या भविष्य काळातील सितारा आहोत हे सिद्ध केले आहे. मला त्याची एक गोष्ट खूप आवडली त्याने तो एक सर्वोत्तम खेळाडू आहे हे तर सिद्ध केलेच पण माणूस म्हणून सुद्धा श्रेष्ठ आहे हे सुद्धा सप्रमाण दाखवले. त्याने विश्व चषका मध्ये मिळालेली सगळी रक्कम आणि कमाई जवळपास २३ करोड रुपये मदत म्हणून केली आहे. Preiers de Cordees association या संस्थेला त्यांनी ही मदत दिली आहे. तो काही जन्मजात श्रीमंत नाही. या गुणी खेळाडूचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याने खूप कष्ट सोसून 
फ्रान्स संघात स्थान मिळवले आहे. त्याला “फिफा युवा खेळाडू पुरस्कार” प्राप्त झाला. आणि सर्वात युवा खेळाडूने विश्व चषकात गोल करून पेले यांच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली.


“नोवाक जोकोविच” या एकतीस वर्षीय सर्बिअन खेळाडूने तेरावे ग्रँड स्लॅम जिंकले. या गुणवान खेळाडूने आत्ता पर्यंत १३ ग्रँड स्लॅम, ५ ATP फॉयनल, ६ ऑस्ट्रेलिया ओपन, २ अमेरिका ओपन, १ फ्रेंच ओपन आणि इतर बऱ्याच काही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. जोकोविच हा सर्वोत्तम टेनिसपटू मधील एक खेळाडू म्हणून गणला जातो. तेरावे ग्रँड स्लॅम जिंकल्या नंतर त्याने एक भावनिक आणि हृदयस्पर्शी पोस्ट केली. आपल्याला स्वत:चे गुणगान करायला आवडते पण आपण आपल्या चुका जगजाहीर करत नाही. त्या पोस्ट मध्ये त्याने त्याच्या जीवनातील कुटुंब, दुखापत आणि टेनिस बद्दल प्रेरणादायी पोस्ट लिहिली आहे. या खेळाडूच लग्न झाल्या नंतर त्याला कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव झाली. दुखापत झाल्यानंतर स्वत:च्या दोषाची आणि गुणाची उजळणी यांचा लेखाजोखा त्याने मांडला आहे. त्यावर जबरदस्त मात करून त्याने यशस्वी पुनरागमन केले आहे. असे करून या खेळाडूने सगळ्याचं मन जिंकलं आहे.


"हिमा दास"
"किलीअन म्बाप्पे"

“नोवाक जोकोविच”

Tuesday, July 10, 2018

Textual description of firstImageUrl

कविता / प्रकाशचित्र - अद्वितीय वारी

कविता : 

आनंदाचे निधान वारी
आत्म्याचे कल्याण वारी
मैलोन् मैल प्रवास वारी
आत्म्यावर प्रकाश म्हणजे वारी

एकच ध्यास वारी
पंढरीची आस वारी
एकच अट्टहास वारी
धगधगती भक्तीची ज्योत वारी

माऊलीचा गजर वारी
भक्तांचा कुंभमेळा वारी
समाज प्रबोधन वारी
जगण्याचा आधार म्हणजे वारी

वैष्णवाचा मेळा वारी
उत्साहाचा झरा वारी
भक्तीचा मळा वारी
माऊलीचा स्पर्श म्हणजे वारी

अखंड नामाचा गजर वारी
व्यवस्थापनाचा कळस वारी
सामाजिक सलोखा वारी
अमृतकणांचा वर्षाव म्हणजे वारी

मानवतेचे उत्तुंग दर्शन वारी
निरपेक्षपणाचे लक्षण वारी
अध्यात्माचे सुगम दर्शन वारी
संताचे पवित्र अधिष्ठान म्हणजे वारी

प्रकाशचित्र :


प्रचि - पाऊले चालती पंढरीची वाट
प्रचि - दिंडी

प्रचि - पालखीची ओढ

प्रचि - आपलेच ओझे आपणच वहावे
प्रचि - वाट माझी एकट्याची

प्रचि - दिंडी मालट्रक

प्रचि - आपलेच ओझे आपणच वहावे

प्रचि - तिलक

प्रचि - पाऊले चालती पंढरीची वाट
प्रचि - पाऊले चालती पंढरीची वाट

प्रचि - सात्वन
प्रचि - स्वयंसेवकप्रचि - भेटीची आस

प्रचि - व्यवसाय

प्रचि - माऊली आणि विठोबा

प्रचि - दिंडी १३४

प्रचि - वाटप मंडप

प्रचि - भजन

प्रचि - एक वारकरी लाख वारकरी

प्रचि - एक भाव

प्रचि - मुद्रा

प्रचि - तुळस

प्रचि - कुतुहूल

प्रचि - मुद्रा

प्रचि - पालखीची वाट

प्रचि - पालखीची प्रतीक्षा

प्रचि - पालखीची प्रतीक्षा
शब्द : प्रकाशचित्र - Photo प्रचि - Photo